ताज्या बातम्या
मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक
मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.
मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. रेल्वेच्या मध्य आणि हार्बर उपनगरीय रेल्वे मार्गावर देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार असून यासाठी आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.
रेल्वे मार्गावर रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची तांत्रिक कामे, तसेच अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे. अनेक नियमित फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून मुंबई लोकलचं वेळापत्रक पाहूनच बाहेर पडा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मध्य रेल्वेवर सकाळी 11.15 ते दुपारी 3.45 पर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे तर हार्बर रेल्वेवर सकाळी 11.10 ते दुपारी 4.47 पर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे. काही अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात येणार आहेत.