Kokan Railway Megablock : 16,17 नोव्हेंबरला मेगाब्लॉक कोकण रेल्वेच्या मार्गांवर मेगाब्लॉक

Kokan Railway Megablock : 16,17 नोव्हेंबरला मेगाब्लॉक कोकण रेल्वेच्या मार्गांवर मेगाब्लॉक

कोकण रेल्वेच्या मार्गांवर दोन दिवस मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Published by  :
shweta walge

कोकण रेल्वेच्या मार्गांवर दोन दिवस मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मडगाव-कुमठा आणि राजापूर रोड ते सिंधुदुर्ग या विभागात १६ आणि १७ नोव्हेंबर असे दोन दिवस अनुक्रमे तीन आणि अडीच तासांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. या मेगाब्लॉकमुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात अंशत: बदल करण्यात आला आहे.

मडगाव- कुमठा दुरुस्तीचे काम होणार असल्याने दोन गाड्यांचे वेळापत्रक प्रभावित होणार आहे. मंगळुरू सेंट्रल-मडगाव जंक्शन या गाडीचा प्रवास १६ नोव्हेंबर रोजी कुमठा स्थानकावर थांबेल आणि कुमठा ते मडगाव विभागादरम्यान अंशतः रद्द होईल. मडगाव जंक्शन- मंगळुरू सेंट्रल या गाडीचा १६ नोव्हेंबर रोजीचा प्रवास कुमठा स्थानकातून नियोजित वेळेत सुरू होईल. परंतु, मडगाव-कुमठा विभागादरम्यान अंशतः रद्द होईल, असे कोकण रेल्वेने कळविले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com