अंधेरीतील गोखले पुलावरील गर्डरच्या कामासाठी पश्चिम रेल्वेवर 11, 12 मार्च रोजी 'मेगाब्लॉक'

अंधेरीतील गोखले पुलावरील गर्डरच्या कामासाठी पश्चिम रेल्वेवर 11, 12 मार्च रोजी 'मेगाब्लॉक'

अंधेरीतील गोखले पुलावरील गर्डरच्या कामासाठी पश्चिम रेल्वेवर 11, 12 मार्च रोजी 'मेगाब्लॉक' घेण्यात येणार आहे.

अंधेरीतील गोखले पुलावरील गर्डरच्या कामासाठी पश्चिम रेल्वेवर 11, 12 मार्च रोजी 'मेगाब्लॉक' घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवरील विलेपार्ले आणि अंधेरी स्थानकादरम्यान शनिवारी रात्री 9.30 ते रविवारी पहाटे 5.30 वाजेपर्यंत ‘ब्लॉक’ घेण्यात येणार आहे.

अंधेरीतील धोकादायक गोखले पुलाचे पाडकाम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या पुलाचे पाडकाम करण्यासाठी पश्चिम रेल्वेने आज शनिवारी, 8 तासांचा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. गोरेगाव ते चर्चगेट हार्बर मार्गावरून प्रवासी प्रवास करू शकतात. तर गोरेगाव स्टेशनच्या प्लॅटफॉर्म 1 आणि 2 वरून अतिरिक्त सेवा सुरू होतील.

शनिवारी रात्री सव्वा अकरा वाजता सुटणारी विरार-चर्चगेट ही शेवटची जलद लोकल असणार आहे. तर बोरिवलीहून चर्चगेटसाठी स्लो लोकल रात्री 11.34 वाजता सुटणार आहे.

गोखले पूल बंद झाल्यानंतर वाहतूकीसाठी कोणते पर्यायी मार्ग

कॅप्टन गोरे ब्रीज

मिलन सबवे

अंधेरी सबवे

खार सबवे

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com