अंधेरीतील गोखले ब्रिजच्या पाडकामासाठी पश्चिम रेल्वेवर आज आणि उद्या मेगाब्लॉक

अंधेरीतील गोखले ब्रिजच्या पाडकामासाठी पश्चिम रेल्वेवर आज आणि उद्या मेगाब्लॉक

अंधेरीतील गोखले ब्रिजच्या पाडकामासाठी पश्चिम रेल्वेवर आज आणि उद्या मेगाब्लॉक
Published by  :
Siddhi Naringrekar

अंधेरीतील गोखले ब्रिजच्या पाडकामासाठी पश्चिम रेल्वेवर आज आणि उद्या मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूल धोकादायक झाल्यामुळे तो पाडण्याचा निर्णय अखेर घेण्यात आला होता. हा पूल तोडण्याच्या कामास प्रत्यक्षात 11 जानेवारीच्या रात्रीपासूनच सुरुवात झाली होती. अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा पश्चिम उपनगरातील वाहतुकीच्या दृष्टीने गोखले ब्रिज अत्यंत महत्त्वाचा आहे. वाहतुकीसाठी धोकादायक झाल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून हा ब्रिज वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता.

 21 आणि 22 च्या रात्री तसेच 24 आणि 25 च्या मध्यरात्री साडेचार तासांचा मेगाब्लॉक (Mega Block) घेतले जाणार आहेत. यामुळे पश्चिम रेल्वेवरील काही लोकल आणि एक्सप्रेस गाड्या या रद्द करण्यात आलेल्या आहेत. तसेच काहींच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आलेला आहे.

गोखले ब्रिज बंद करत असताना मुंबई महापालिकेने या ब्रिजचा पश्चिम रेल्वे लाईनवरील भाग पाडण्याची तयारी करावी, या आशयाचं पत्र पश्चिम रेल्वे प्रशासनाला दिलं होतं. त्यावर या संपूर्ण ब्रिज पाड काम हे मुंबई महापालिका करणार असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं. 

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com