बीड जिल्ह्यातील 13 सरपंच आणि 418 जणांचे सदस्यत्व रद्द

बीड जिल्ह्यातील 13 सरपंच आणि 418 जणांचे सदस्यत्व रद्द

बीड जिल्ह्यातील 13 सरपंच आणि 418 जणांचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

बीड जिल्ह्यातील 13 सरपंच आणि 418 जणांचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी जिल्ह्यातील आणखी 13 सरपंचासह 418 जणांचे सदस्यत्व रद्द केले आहे. जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी जिल्ह्यातील आणखी 13 सरपंचासह 418 जणांचे सदस्यत्व रद्द केले आहे.

अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मागास प्रवर्गासाठीच्या राखीव असलेल्या जागांवर निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीस जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र निवडून आल्यानंतर बारा महिन्यांच्या कालावधीत देणं गरजेचं असते.

मात्र सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र दिलेल्या मुदतीत सादर न केल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com