Riteish Deshmukh : 'लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात', भाजप नेत्यांच्या वक्तव्यावर रितेश देशमुखांचे उत्तर
Riteish Deshmukh On BJP State President Ravindra Chavan : लातूरमधील प्रचारसभेत बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या एका विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूरमधून संपतील, असे त्यांनी म्हटल्याचा आरोप होत असून, या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
काँग्रेस पक्षाने या विधानाचा निषेध करत चव्हाण यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे. आमदार अमित देशमुख यांनीही हे वक्तव्य महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारे असल्याचे म्हटले आहे. अभिनेता रितेश देशमुख यांनीसुद्धा जनतेच्या मनातून कुणाचं नाव पुसता येत नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
वाद वाढल्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी स्पष्टीकरण देत, कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त केली. विकासाच्या मुद्द्यावरून विधान केले गेले होते, त्याचा वेगळा अर्थ काढू नये, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, लातूरमधील ज्येष्ठ राजकीय नेत्यांनीही या विधानावर नाराजी व्यक्त केली असून, हा मुद्दा आता राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे.

