Maharashtra Weather Update :  हवामान विभागाचा पुन्हा धडकी भरवणारा अंदाज, पाऊस झोडपणार

Maharashtra Weather Update : हवामान विभागाचा पुन्हा धडकी भरवणारा अंदाज, पाऊस झोडपणार

काही दिवसांपूर्वी राज्यात पावसाचा कहर बघायला मिळाला. (Maharashtra Weather Update) अनेक भागात अतिवृष्टी झाली. आता पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाने धडकी भरवणारा अंदाज वर्तवलाय.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

थोडक्यात

  • काही दिवसांपूर्वी राज्यात पावसाचा कहर बघायला मिळाला

  • भारतीय हवामान विभागाने धडकी भरवणारा अंदाज वर्तवलाय

  • किनारपट्टी भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

काही दिवसांपूर्वी राज्यात पावसाचा कहर बघायला मिळाला. अनेक भागात अतिवृष्टी झाली. आता पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाने धडकी भरवणारा अंदाज वर्तवलाय. राज्याताली अनेक भागात पुन्हा एकदा पाऊस झोडपणार आहे. रत्नागिरी- कोकण आणि गोव्यात पुढचे दोन दिवस वादळी पावसाची शक्यता आहे. दक्षिण पुर्व अरबी समुद्रात लक्षद्वीप जवळ हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झालीये. वादळी पावसाचा यलो अलर्ट, पुढील दोन दिवस देण्यात आला. 19 आँक्टोबरपर्यत कमी दाबाच्या क्षेत्रात रुपातरीत होणार. कर्नाटक आणि केरळपर्यत समांतर क्षेत्र निर्माण होईल. त्याचा प्रभाव कोकण किनारपट्टी भागात जाणवणार आहे. किनारपट्टी भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता.

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरात वातावरणात बदल जाणवू लागले असून आज सकाळपासूनच हलक्या सरींची सुरूवात झाली आहे. या हवामानातील बदलामुळे पुढील दोन दिवस राज्यात पावसाची तीव्रता वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून,नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अहिल्यानगरच्या कोल्हार बुद्रुक गावात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिक हैराण झालेत. रायगड जिल्ह्यात अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी चिंतेत आहेत. तोंडाशी आलेलं भातपिक आता पावसामुळे धोक्यात आलं असून कापणी केलेल्या शेतीचं नुकसान होण्याची शक्यता आहे.

दक्षिण रायगड भागात विजांच्या कडकडाटा सहमुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अचानक आलेल्या या पावसा मुळे नागरिकांचीही तारांबळ उडाली आहे. फक्त कोकणच नाही तर राज्यातील इतरही भागात पावसाचे संकेत आहेत. राज्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर केली. मात्र, शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक भागात पाऊस इतका जास्त झाला की, संपूर्ण शेती वाहून गेली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com