मेट्रो 4 चा मार्गातील अडथळा दूर; प्रकल्पाविरोधातील दोन्ही याचिका हायकोर्टानं फेटाळल्या
Admin

मेट्रो 4 चा मार्गातील अडथळा दूर; प्रकल्पाविरोधातील दोन्ही याचिका हायकोर्टानं फेटाळल्या

मेट्रो 4 प्रकल्पाविरोधातील दोन्ही याचिका हायकोर्टानं फेटाळल्या आहेत.

मेट्रो 4 प्रकल्पाविरोधातील दोन्ही याचिका हायकोर्टानं फेटाळल्या आहेत. वडाळा ते कासारवडवली या मेट्रो-4 मार्गातील अडथळा दूर करत मुंबई उच्च न्यायालयानं या याचिका फेटाळून लावल्या आहेत. या प्रकल्पाचे जवळपास दोन वर्षांपासून रखडलेले कामही आता मार्गी लागणार आहे. हा प्रकल्प राबवण्याचे एमएमआरडीएला पूर्ण अधिकार आहेत.

मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापुरवाला आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठानं गुरुवारी जाहीर करत याचिकाकर्त्यांचा दावा फेटाळून लावला. ठाण्यातील कासारवडवली ते वडाळा भक्ती पार्क असा हा मार्ग आहे. ठाण्यातील तीन हात नाका, मुलुंडमधील आर-मॉल, भांडुप एलबीएस मार्ग, गरोडिया नगर ही या मार्गावरील महत्त्वाची स्थानकं आहेत.

इंडो निप्पॉन कंपनी आणि गरोडिया नगरमधील श्री यशवंत सहकारी गृहनिर्माण संस्थेनं याला विरोध करत दोन स्वतंत्र याचिका हायकोर्टात दाखल केल्या होत्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com