Mumbai Metro 7 : मुंबईकरांना दिलासा! मेट्रो 7 च्या TBM चे 'या' स्थानकातील काम अंतिम टप्प्यात
मुंबईतील मेट्रो 7 चा महत्वपूर्ण टप्पा पूर्णत्वास येत आहे. गुरुवार, 17 एप्रिलपासून मेट्रो 7 चा टनेल ब्रेक थ्रू पार पडणार आहे. मेट्रो 7 च्या अंतिम टप्प्याचे काम छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी 2) येथे होत आहे. टी 2 पासून टनेलची सुरुवात झाली असून 1.7 किलोमीटर लांबीचा हा बोगदा आहे. टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) डाऊन मार्गावरील बोगद्याचे काम उद्या पूर्ण करेल. अंधेरी टी 2 ते गुंदवली असा हा मार्ग टनेलपासून पुढे उन्नत मार्ग असेल. या मार्गावर 13 स्थानके असून गुंदवली ते दहिसर पूर्व अशी मेट्रो सध्या सुरू आहे. मात्र लवकरच गुंदवली ते विमानतळ रस्ता असा प्रवास प्रवाशांना करता येणार आहे.
मेट्रो 7 ही मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी (MMRDA) द्वारे विकसित करण्यात आली आहे. मेट्रो 7 वर 13 स्थानके असून 16.4 किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड मेट्रो प्रोजेक्ट असून ही रेड लाईन आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते एप्रिल 2022 मध्ये पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले. यातील एलिव्हेटेड आणि टनलचे काम पूर्णत्वास आले असून लवकरच पूर्ण क्षमतेने मेट्रो धावण्याची शक्यता आहे.
टनेल ब्रेक थ्रू
मुंबई मेट्रो 7 मधील टनेलचा गुरुवारी ब्रेक थ्रू होणार आहे. या ब्रेक थ्रूदरम्यान टीबीएम मशीन 1.7 किमीचा बोगदा पूर्ण करेल. त्याचप्रमाणे मार्गावरील बोगदा असून यातून निघणारे गुंदवली येथे पोहोचणार आहे. मेट्रो 7 आणि मेट्रो 3 ही मुंबई आंतरराष्ट्रीय टर्मिनल येथे समांतर असणार आहे. त्यामुळे मेट्रो 3 च्या प्रवाशांना मेट्रो 7 मध्ये सुद्धा जाण्यासाठी मार्ग राहणार आहे.
याबाबत अभियांत्रिकी अधिकारी कृष्णा गुप्ता यांनी माहिती दिली की, "मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स टी 2 येथून सुरू होणारा मेट्रोचा टनेल हा 1.7 किलोमीटरचा टप्पा पूर्ण करून पूर्णत्वास जाईल. दहिसर येथील लाईन 7 चा कॉरिडॉर उत्तरेकडे मीरा भाईंदरपर्यंत मेट्रो 9 म्हणून वाढवण्यात आला. दक्षिणेकडील टोकाला, तो अंधेरीपासून सीएसएमआयए टी 2 आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत मेट्रो 7 अ म्हणून वाढवण्यात आला. 7, 7 अ आणि 9 क्रमांकाच्या मार्गांना एकत्रितपणे रेड लाईन मेट्रो मुंबई असे म्हणतात."
मेट्रो 7 ही सध्या अंधेरी गुंदवली स्टेशनपासून ते दहिसर पूर्वपर्यंत धावत आहे. मात्र यातील पुढील स्टेशन हे विमानतळ रस्ता आणि टी 2 पर्यंत जाणार आहे. त्यामुळे मेट्रो 7 चा शेवटचा टप्पा सुरू झाल्यावर लाखो मुंबईकर आणि प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.