MHADA House : म्हाडाच्या घरांच्या किंमती कमी होणार; प्राधिकरणाकडून त्रिसदस्यीय समितीची नेमणूक

MHADA House : म्हाडाच्या घरांच्या किंमती कमी होणार; प्राधिकरणाकडून त्रिसदस्यीय समितीची नेमणूक

घरांच्या वाढत्या किमती पाहून घर घेणे हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले असून मुंबईत घराच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

घरांच्या वाढत्या किमती पाहून घर घेणे हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले असून मुंबईत घराच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. यातच आता म्हाडाच्या घरांच्या वाढच्या किमती पाहता म्हाडाच्या घरांच्या किमती निश्चित करण्याबाबतच्या सूत्राची पुनर्रचना करण्यासाठी प्राधिकरणाने त्रिसदस्यीय समिती नेमणूक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

पुढील तीन महिन्यांत ही समिती आपला अहवाल उपाध्यक्षांकडे सादर करणार असून त्यानंतर तो मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला जाणार आहे.

सर्वसामान्यांना स्वस्तात घर मिळेल आणि म्हाडाचेदेखील नुकसान होणार नाही यादृष्टीने ही समिती अभ्यास करणार असल्याचे सांगितले जात असून पुढील तीन महिन्यांत समिती हा अहवाल सादर करण्यात येणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com