Mhada Lottery
Mhada Lottery

Mhada Lottery: नववर्षात सर्वसामान्यांचं घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण

नववर्षात सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न साकार होणार, म्हाडाकडून अडीच ते तीन हजार घरांची लॉटरी काढण्याचे नियोजन करण्यात आलं आहे.
Published by :
Published on

नववर्षाच्या आगमनासोबतच, मुंबईकरांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. MHADA (Maharashtra Housing and Area Development Authority) ने २०२५ वर्षात सर्वसामान्यांसाठी साधारण ३ हजार घरांची लॉटरी काढण्याचं नियोजन केलं आहे. MHADA ची ही लॉटरी योजना, विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील नागरिकांसाठी मोठा दिलासा असणार आहे. नववर्षात सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न साकार होणार आहे. म्हाडाकडून नव्या वर्षामध्ये अडीच ते तीन हजार घरांची लॉटरी काढण्याचे नियोजन आहे.

दिवाळीत लॉटरी काढली जाणार असून त्यात अत्यल्प आणि अल्प गटासाठी अधिकाधिक घरे राखीव ठेवण्याचा प्रयत्न आहे. म्हाडाच्या मुंबई आणि कोकण मंडळाकडून वर्षातून किमान दोन लॉटरी काढल्या जातात. आता नवीन सरकार आल्यानंतर काढण्यात येणाऱ्या घरांच्या किमती नेमक्या किती असतील? हे आकडे गुलदस्त्यात असले तरी सर्वसाधारण म्हाडाच्या घराची किंमत ३४ लाखांपासून सुरू होते. मात्र म्हाडाच्या घराची किंमत किमान २७ लाख असली पाहिजे, अशी मुंबईकरांची मागणी आहे.

इथे असणार आहेत घरे

  • गोरेगाव पहाडी : दोन वर्षांमध्ये अडीच हजार घरे बांधत जाणार आहेत. नव्या वर्षात यातील काही घरांचा समावेः लॉटरीमध्ये होईल. अत्यल्प आणि अल्प गटासाठी सर्वाधिक घरे बांधण्यासाठी म्हाडा प्रयत्नशील आहे.

  • अंधेरी, जुहू, गोरेगांव, कांदिवली, बोरिवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदे सायन येथे घरे असतील.

सविस्तर बातमी पाहण्यासाठी क्लिक करा-

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com