Bacchu Kadu : बच्चू कडू यांना मोठा धक्का ; जिल्हा बँक अध्यक्षपदावरून अपात्र

Bacchu Kadu : बच्चू कडू यांना मोठा धक्का ; जिल्हा बँक अध्यक्षपदावरून अपात्र

न्यायालयाच्या आदेशाने बच्चू कडू यांनी अध्यक्षपद गमावले
Published by :
Shamal Sawant
Published on

सध्या प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहेत. उपोषण स्थगितीनंतर त्यांच्याबद्दलची एक मोठी बातमी समोर आली आहे. अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदावरून आता बच्चू कडू यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यामुळे बच्चू कडू यांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान न्यायालयाच्या एका वर्षांच्या शिक्षेचा ठपका ठेवत हा निर्णय घेण्यात आल्याचे समोर आले आहे.

बच्चू कडू यांना नोटिस

बच्चू कडू यांना एका प्रकरणामध्ये एका वर्षांची शिक्षा ठोठावल्याचा दाखला त्यांनी दिला आहे. यामध्ये या कारणांचा आधार घेत विभागीत सहनिबंधक यांनी अपात्र का करण्यात येऊ नये अशी नोटिस बच्चू कडू यांना पाठवण्यात आली. दरम्यान 24 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता साक्ष नोंदवण्याकरिता उपस्थित राहून आपले म्हणणे सादर करावे असे नोटिसमध्ये सांगण्यात आले आहे.

एका वर्षाच्या कारवाईचा ठपका

नाशिकच्या विशेष न्यायालयाने 2021 साली बच्चू कडू यांना एका वर्षांची कठोर कारवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. या शिक्षेला बच्चू कडू यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात आव्हान दिले. ही प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com