दक्षिण मुंबईसाठी मिलिंद देवरा यांचं नाव चर्चेत; म्हणाले...

दक्षिण मुंबईसाठी मिलिंद देवरा यांचं नाव चर्चेत; म्हणाले...

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. दक्षिण मुंबई या लोकसभेच्या जागेसाठी महायुतीकडून अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. दक्षिण मुंबईसाठी मिलिंद देवरा यांच्या नावाची चर्चा असल्याची माहिती मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर मिलिंद देवरा म्हणाले की, मी आधीच राज्यसभेचा खासदार आहे. दक्षिण मुंबई माझा परिवार आहे. दक्षिण मुंबई कर्मभूमी आहे. मी दक्षिण मुंबईतून अनेकवेळा खासदार निवडून आलो आहे. मला जर संधी मिळेल महायुतीने जर माझ्या नावाचा विचार केला तर मी दक्षिण मुंबईमधून लोकसभेची निवडणूक लढवण्यात इच्छुक आहे. महायुतीच्या सर्व नेत्यांचा एकच उद्दिष्ट आहे अरविंद सावंत यांना आपल्याला पराभूत करावं लागेल.

यासोबतच ते म्हणाले की, अरविंद सावंत यांनी गेल्या 10 वर्ष मुंबईमध्ये आणि खासकरुन दक्षिण मुंबईमध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य लोकांसाठी त्यांनी एकही मिटींग घेतली नाही. प्रत्येक मराठी माणसांची एकच इच्छा आहे की त्यांना कायमस्वरुपी घर मिळायला पाहिजे. मला खुर्चीचा मोह नाही मला जनतेसाठी काम करायचे आहे. जनतेसाठी संघर्ष करायचा आहे. असे मिलिंद देवरा म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com