ताज्या बातम्या
Milk Price Hike : गाय - म्हशीचे दूध 2 रुपयांनी महागलं; ‘या’ तारखेपासून नवे दर लागू होणार
गायीचे दूध 2 रुपयांनी महागणार आहे.
गायीचे दूध 2 रुपयांनी महागणार आहे. गायीच्या दुधाची विक्री 56 वरून 58 रुपये, तर म्हशीच्या दुधाची विक्री 72 वरून 74 रुपये होणार आहे. राज्यात दुधाच्या खरेदी दरात अलीकडे सातत्याने वाढ झालेली आहे. त्यामुळे गाय आणि म्हैस दूध विक्री दरात प्रतिलिटरला दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के आणि मानद सचिव प्रकाश कुतवळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. या निर्णयाची अंमलबजावणी शनिवारपासून होणार आहे.