मुंबईसह उपनगरांत किमान तापमानात घट

मुंबईत उपनगरात किमान तापमानात घट झालेली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

मुंबईत उपनगरात किमान तापमानात घट झालेली आहे. मुंबईत उपनगरात किमान तापमान आठवड्याच्या सुरुवातीस 20 अंशाखाली घसरले आहे.

उपनगरातील किमान तापमानातील घट कायम असल्याचे पाहायला मिळत असून गुरुवारी सांताक्रूझ केंद्रात किमान तापमान 19 अंशाखाली गेल्याची माहिती मिळत आहे.

उत्तरेतील थंड वाऱ्यामुळे राज्यातील उत्तर महाराष्ट्राच्या किमान तापमानात घट होत असून मागील काही दिवस मुंबईच्या हवेचा दर्जा खालावला होता.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com