Sharad Pawar, Chandrakant Patil
Sharad Pawar, Chandrakant PatilTeam Lokshahi

शरद पवारांना नाकारणाऱ्या ब्राह्मण महासंघाने चंद्रकांत पाटलांचे निमंत्रण स्वीकारलं

राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी दिलेलं चहापानाचं निमंत्रण नाकारणाऱ्या ब्राह्मण महासंघाला आता भाजपचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी चहापाण्याचे निमंत्रण दिलं आहे. विशेष म्हणजे ब्राह्मण महासंघाने देखील हे निमंत्रण स्वीकारलं आहे.
Published by :
shweta walge

पुणे : राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी दिलेलं चहापानाचं निमंत्रण नाकारणाऱ्या ब्राह्मण महासंघाला आता भाजपचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी चहापाण्याचे निमंत्रण दिलं आहे. विशेष म्हणजे ब्राह्मण महासंघाने देखील हे निमंत्रण स्वीकारलं आहे.

उद्या सकाळी चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड येथील निवासस्थानी ब्राह्मण महासंघ आणि चंद्रकांत पाटील यांच्यात बैठक पार पडणार आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी देखील राज्यातील ब्राह्मण संघटनांना चर्चेसाठी निमंत्रण दिलं होतं. मात्र ब्राह्मण महासंघाने शरद पवार यांचं हे निमंत्रण धुडकावलं होतं. मात्र त्याच ब्राह्मण महासंघाने चंद्रकांत पाटील यांचे भेटीचे निमंत्रण स्वीकारल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे या दोघांच्या भेटीत नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी ब्राह्मण समाजाबद्दल केलेल्या विधानांमुळे ब्राह्मण समाजाने आंदोलने करून राष्ट्रवादीला लक्ष्य केले होते. या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलावले होते. मात्र, ब्राह्मण संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी ह्या आमत्रंणास नकार दिला होता. यातच आता चंद्रकांत पाटील यांनी ब्राह्मण संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना चहापाण्याचे निमंत्रण दिलं आहे आणि ब्राह्मण महासंघाने देखील हे निमंत्रण स्वीकारलं आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका ताब्यात घेण्यासाठी चंद्रकांत पाटील आतापासून तयारीला लागले आहेत.

Sharad Pawar, Chandrakant Patil
शिंदे गटात जाणार? राजन साळवी म्हणाले, मला खोक्याची...
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com