अपघातग्रस्त्यांच्या मदतीसाठी धावून गेले मंत्री मुनगंटीवार

अपघातग्रस्त्यांच्या मदतीसाठी धावून गेले मंत्री मुनगंटीवार

अपघातातील जखमींसाठी देवदूतासारखे धावले पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार,जिल्हा शल्यचिकित्सक, वैद्यकिय अधिष्ठाता यांना फोन करत, अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयाकडे रवाना केले.

अनिल ठाकरे। चंद्रपूर: चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार अपघातातील जखमींसाठी देवदूतासारखे धाऊन आले. मुनगंटीवार यांनी जखमींना तातडीने रुग्णालयाकडे रवाना केल्यामुळे प्राण वाचले.

चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मंत्री सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर येथील चांदा क्लबच्या मैदानावर आयोजित सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर मूलकडे मार्गस्थ झालेत. सावलीतील पेंढरी (मक्ता) येथे आयोजित मत्स महोत्सवात मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत राहण्यासाठी मार्गस्थ असताना चंद्रपूर- मुल मार्गावर अपघात झाल्याचे मुनगंटीवार यांना दिसले. चंद्रपूर - मूल मार्गावर कार आणि दुचाकीचा हा अपघात नुकताच झाला होता. त्यामुळे मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना ताफा थांबविण्याची सूचना केली. ताफा थांबताच मुनगंटीवार स्वत: वाहनातून खाली उतरले व त्यांनी अपघातातील जखमींची आस्थेने विचारपूस केली. अपघातातील जखमी गंभीर असल्याचे लक्षात येताच मुनगंटीवार यांनी चंद्रपूरच्या जिल्हा शल्य चिकित्सक व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांना फोनवरून जखमींना तातडीने उपचार उपलब्ध करून देण्याचे आदेश दिलेत. मुनगंटीवार देवदूतासारखे धाऊन आल्याने जखमींना गहिवरून आले. तातडीने मदत मिळाल्याने जखमींच्या परिवाराने मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त केले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com