Shambhuraj Desai
Shambhuraj Desai

"पुरावे नसताना हवेत तीर मारले, तर..."; शंभुराज देसाईंनी आमदार रवींद्र धंगेकरांना दिला इशारा

शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकरांनी राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात जाऊन पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. त्यांनी शंभुराज देसाई यांच्यावरही आरोप केल्यानं राजकीय वातावरण तापलं आहे.
Published by :

Shambhuraj Desai Press Conference : पुणे पोर्शे कार अपघातानंतर आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुण्यातील बेकायदेशीर पब्जवर कारवाई होण्यासाठी सरकारला धारेवर धरण्याचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकरांनी राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात जाऊन पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. त्यांनी शंभुराज देसाई यांच्यावरही आरोप केल्यानं राजकीय वातावरण तापलं. अशातच मंत्री शंभुराज देसाई यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे. माझ्याकडे नोटिस तयार आहे. पुढील ७२ तासांत मी संबंधीतांना नोटिस बजावणार आहे.आमच्यावर जे आरोप केले आहेत, त्याचे पुरावे द्या. पुरावे काही नसतील आणि हवेत तीर मारायचे, अशा हवेत तीर मारणाऱ्यांवर आम्ही फारसं लक्ष देत नाहीत, असं मंत्री शंभुराज देसाई म्हणाले.

रवींद्र धंगेकरांनी स्टिंग ऑपरेशन केल्यानंतर हे प्रकरण समोर आलं. अधिकारी पैसे खातात, हे त्यांनी पुणे पोलिसांसमोर मांडलं, यावर प्रतिक्रिया देताना शंभुराज देसाई म्हणाले, उद्या कुणीही यादी लिहिल आणि कुणी कुठे पैसे खाल्ले याबाबत सांगतील, पण त्याचा पुरावा द्या ना. त्यांनी स्टिंग ऑपरेशन केलं असेल तर त्याचा पुरावा द्या. स्टिंग ऑपरेशनचे ऑडिओ, व्हिडीओ असतील तर ते समोर आणा. पोलिसांच्या फॉरेन्सिक डिपार्टमेंटकडे द्या. त्याची चौकशी होऊ द्या. आमच्यावर जे आरोप केले आहेत, त्याचे पुरावे द्या. पुरावे काही नसतील आणि हवेत तीर मारायचे, अशा हवेत तीर मारणाऱ्यांवर आम्ही फारसं लक्ष देत नाहीत.

तसच पत्रकार परिषदेत देसाईंनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला. ते म्हणाले, उबाठाच्या नेत्यांना दुसरं कोणतंही काम उरलं नाही. ललित पाटील प्रकरणात उबाठाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी वक्तव्य केल्यानंतर मी न्यायालयात गेलो. विनायक राऊत म्हणाले, शंभूराज उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत. मी असंच त्यांना अल्टिमेटम दिलं. २४ तासांच्या आत स्पष्ट करा, नाहीतर मी तुमच्यावर कायदेशीर कारवाई करेन. मी इशाऱ्या दिल्यावर विनायक राऊतांनी माध्यमांसमोर सांगितलं, हा शंभूराज देसाई तो नाही. मग मी त्यांना पुन्हा म्हणालो, दुसरा कोणता शंभूराज देसाई आहे, त्यांना पुढे आणा. जे उद्धव साहेबांच्या संपर्कात आहेत. पण ते आणू शकले नाहीत.

तथ्यहिन बोलायचं, पुरावा नसताना बोलायचं. स्टंट करायची सवय या लोकांना लागली आहे. कारण जनतेनं यांना नाकारलं आहे. अशी वक्तव्य करून स्वत:कडे लक्ष केंद्रित करून घ्यायचं, असा प्रयत्न उबाठाचा नेहमी सुरु असतो. सुषमा अंधारेंनी तुमच्यावर पुन्हा एकदा आरोप केला आहे, यावर प्रतिक्रिया देताना देसाई म्हणाले, जी व्यक्ती सामाजिक काम करत असते. आम्ही आमच्या पद्धतीनं पक्षाची प्रामाणिकपणे भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत असतो. आम्ही बोलल्यानंतर त्यांना वाटतं आमच्यामुळे त्यांचं नुकसान होणार आहे. अशी लोक आमच्यासारख्या माणसांना बदनाम करण्याचा काम करतात.

आम्ही प्रामाणिकपणे काम करतो. नियमाला धरून काम करतो. राज्याच्या आणि पक्ष संघटनेच्या हिताचं काम करतो. त्यामुळे मला कुणीही कितीही टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, तरीसुद्धा त्याचा कोणताही परिणाम आमच्यावर होणार नाही. आमच्या समर्थकांवरही त्याचा परिणाम होणार नाही. पुरावे नसताना हवेत तीर मारणाऱ्यांकडे आम्ही लक्ष देत नाही, असं म्हणत देसाईंनी आमदार रवींद्र धंगेकरांवर निशाणा साधला, असंही शंभुराज देसाई म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com