ताज्या बातम्या
मंत्री तानाजी सावंत यांच्या पुतण्याने घेतली शरद पवार यांची भेट; म्हणाले...
मंत्री तानाजी सावंत यांच्या पुतण्याने शरद पवार यांची भेट घेतली आहे.
मंत्री तानाजी सावंत यांच्या पुतण्याने शरद पवार यांची भेट घेतली आहे. पुण्यातील मोदी बागेत अनिल सावंत यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे आता चर्चा रंगल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता अनिल सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अनिल सावंत म्हणाले की, ही सदिच्छा भेट होती. वैयक्तिक कामांसाठी साहेबांची भेट घेणं गरजेची होती. त्यासंदर्भात बोलणं झाले. विधानसभेची तयारी तर चालू आहे. इच्छाशक्ती आहे.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, यासंदर्भात योग्यवेळ आली की सर्वांना कळेल. पंढरपूर-मंगळवेढा डोक्यात आहे. साहेबांची वैयक्तिक भेट घेणं आणि दुसऱ्या कामानिमित्त भेट होती आणि ती झाली. असे अनिल सावंत म्हणाले.