Uday Samant : ठाकरेंच्या सेनेला तडा जाणार! मोठा नेता BJP च्या वाटेवर, उदय सामंतांचा गौप्यस्फोट

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसणार असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
Published by :
Prachi Nate

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसणार असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. रत्नागिरीत शिवसेना ठाकरे गटातील एक मोठा नेता भाजपच्या वाटेवर असल्याचा गौप्यस्फोट राज्याचे उद्योग मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी केला आहे.

माध्यमांशी बोलताना उदय सामंत म्हणाले की, "2024 च्या विधानसभा निवडणुकीत रत्नागिरीतून ठाकरे गटाकडून लढलेले उमेदवार सुरेंद्र उर्फ बाळ माने हे भाजपमध्ये प्रवेशासाठी प्रयत्नशील आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सहाय्यकामार्फत भाजप प्रवेशासाठी हालचाली सुरू आहेत".

उदय सामंत यांच्या वक्तव्यामुळे ठाकरे गटात खळबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला एका मागे एक धक्के बसले आहेत. त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com