पालकमंत्री उदय सामंत यांनी चांदेराई गावातील पूर परिस्थीची केली पाहणी

पालकमंत्री उदय सामंत यांनी चांदेराई गावातील पूर परिस्थीची केली पाहणी

जिल्हा नियोजनमधून चांदेराईचा गाळ काढण्यासाठी पालकमंत्री निधी देणार.
Published by  :
Team Lokshahi

निसार शेख, चिपळूण

रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई या गावात राज्याचे उद्योग मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पूर परिस्थीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, की सुमारे ७७ दुकानांमध्ये पाणी शिरले होते. २ दिवस दुकानात पाणी शिरले होते. त्यामुळे प्रत्येक दुकानदाराला प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे. टपरीवाले आहेत त्यांना दहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

ज्या ठिकाणी जमीन खचण्याच्या घटना घडल्या आहेत त्यांची देखील पाहणी करण्याच्या सूचना प्रांताधिकारी यांना दिल्या आहेत. चांदेराई नदीमधिल गाळ जास्तीत जास्त काढण्यात यावा अशी ग्रामस्थांची मागणी होती. त्या मागणी नुसार जिल्हा नियोजन समिती मधून निधीची तरतूद करून सगळा गाळ काढण्यात येईल असे निर्णय घेण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com