ताज्या बातम्या
Mumbai Garbage Vehicle : मुंबईतील कचरा संकलनात घोटाळा; कागदावर 3 वेळा कचरा संकलनाचा उल्लेख, प्रत्यक्षात मात्र
मुंबई महापालिकेतील कचरा वेचक कर्मचा-यांच आयुष्य धोक्यात... धोकादायक कचरा वेचक गाड्यांच कॉंन्ट्रॅक्ट संपवूनही गेली. तरी 15 वर्ष केवळ एकाच व्यक्तीला कॉंन्ट्रॅक्ट दिलं जात आहे.
मुंबई महापालिकेतील कचरा वेचक कर्मचा-यांच आयुष्य धोक्यात... धोकादायक कचरा वेचक गाड्यांच कॉंन्ट्रॅक्ट संपवूनही गेली. तरी 15 वर्ष केवळ एकाच व्यक्तीला कॉंन्ट्रॅक्ट दिलं जात आहे. 3000 कोटींच कॉंन्ट्रॅक्ट, तो लाडका भाऊ कोण? लोकशाही मराठीकडून सवाल करण्यात आला आहे.
मुंबई महानगरपालिकेकडून कचरा वेचण्यासाठी फिरणाऱ्या गाड्या या सकाळ दुपार संध्याकाळ अशा 3 वेळा फिरवण्यासाठीचा नियम आहे. मात्र बहुतेक वेळा या गाड्या केवळ सकाळच्या एकच वेळेस फिरवल्या जातात.
दुपार आणि सायंकाळी या गाड्या कचरा वेचण्यासाठी मुंबईच्या अनेक भागात दिसतच नाहीत. केवळ कागदावरच दुपार आणि संध्याकाळच्या कचरा वेचणाऱ्या गाड्यांच्या फेऱ्या दाखवल्या जात असल्याचा देखील आरोप होत आहे.

