राष्ट्रवादी काँग्रेसचे किती आमदार अजित पवार यांच्यासोबत आहेत हे थोड्याच वेळात समजेल; अण्णा बनसोडे यांनी थेट वेळच सांगितली
Admin

राष्ट्रवादी काँग्रेसचे किती आमदार अजित पवार यांच्यासोबत आहेत हे थोड्याच वेळात समजेल; अण्णा बनसोडे यांनी थेट वेळच सांगितली

राज्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत आहेत.

राज्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. अजित पवार भाजपासोबत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहे.

यातच आता राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. अण्णा बनसोडे म्हणाले की, मी दादांना मानणारा कार्यकर्ता, त्यांच्यावर माझी श्रध्दा आहे. ते जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे. साडेअकरा वाजता मी अजित पवार यांची भेट घेणार आहे. असे ते म्हणाले.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, आमदार मुंबईत आले आहेत. अजितदादांसोबत 40 पेक्षा जास्त आमदार असू शकतात. पुढच्या तासाभरात अजित पवार यांनी भेटणार आहेथोड्याच वेळात अजित पवार यांच्यासोबत किती आमदार हे समजेल असे अण्णा बनसोडे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com