अनिल परब यांना चित्रा वाघ यांचं रोकठोक उत्तर, म्हणाल्या, "तुम्ही असाल पोपट पंडित"
विधान परिषदेमध्ये आज दिशा सालियनचा विषय चांगलाच गाजला. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वादंग झालेलेदेखील बघायला मिळाले. यावेळी आदित्य ठाकरे यांना सत्ताधाऱ्यांकडून लक्ष्य केले गेले. शिवसेना उबाठा पक्षाचे आमदार अनिल परब यांनी याप्रकरणी विधानपरिषदेत बोलताना मंत्री संजय राठोड यांचा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी, त्यांनी आमदार चित्रा वाघ यांचं नाव घेतल्याने चित्रा वाघ चांगल्याच संतापल्याचं पाहायला मिळाल्या.
चित्रा वाघ म्हणाल्या की, "संजय राठोड का मंत्रिमंडळात आहेत? त्याचे उत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंना विचारा, हिंमत असेल तर संजय राठोड यांना का क्लिनचिट दिली हे उद्धव ठाकरेंना विचारा, अशा शब्दात आमदार चित्रा वाघ यांनी सभागृहात शिवसेना उबाठाचे आमदार अनिल परब यांच्यावर पलटवार केला.
तसेच पुढे त्या म्हणाल्या की, "माझं नाव घेऊन बोलण्यात आलं त्यामुळे मी अनिल परब यांना उत्तर देत आहे. तुम्ही असाल पोपट पंडित. माझ्या कुटुंबानं दोन वर्ष खूप सहन केलं. तुमच्यासारखे 56 परब पायाला बांधून फिरते. आम्ही वशिल्याने इथं आलेलो नाही आहोत", असे म्हणत चित्रा वाघ यांनी अनिल परब यांच्यावर निशाणा साधला.