आमदार दादाराव केचेकडून कारंजा तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी
तहसीलदार, कृषी अधिकाऱ्यांसह आमदार दादाराव केचे पोहचले शेतकऱ्याच्या बांधावर
भूपेश बारंगे,वर्धा| वर्ध्याच्या कारंजा(घाडगे )तालुक्यात चार दिवसापूर्वी झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे 50 ते 60 गावात अतिवृष्टी झाली अन् शेतपिकांचे होत्याचं नव्हतं झालं. नदीकाठच्या शेतपिके खरडून गेली, त्यावर नदीतील गोटे ,रेती आणि माती शेतात शिरली. जवळपास दहा हजार हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यातच ब्राम्हणवाडा, धर्ती यासह इतर गावातील आठ जनावरे वाहून गेली. तर 23 घरांच्या भिंती पडझड झाली आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने या आर्वी मतदारसंघाचे आमदार दादाराव केचे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
तालुक्यातील सहा गावातील पिकांची पाहणी करण्यात आली. चंदेवाणी, सेलगाव, धर्ती, बोरी, ठाणेगाव , नागलवाडी शिवारात पाहणी केली आहे. पुरामुळे नदीकाठच्या शेतपिके खरडून गेली. यात सोयाबीन, कपाशी, संत्रा याच मोठं नुकसान झाल आहे. काही रस्ते, पुलाचे कठडे वाहून गेले आहेत. याची पाहणी करण्यात आली संबंधित बांधकाम विभागाला दुरुस्तीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शेतपिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे गांभीर्याने आणि तातडीने करण्याचे निर्देश तहसीलदार, कृषी अधिकारी यांना दिले आहे. राज्य सरकारकडून तातडीने पूरग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे यावेळी सांगितले. तर ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने अनेक भागातील शेतपिकांचे खरडून गेली,पूरग्रस्त शेतकऱ्यांना समस्या यावेळी आमदार दादाराव केचे यांनी जाणून घेतल्या.
तातडीने मदत मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. शेतपिकांचे पंचनामे गांभीर्याने करून कोणताही शेतकरी यातून सुटू नये अशा सूचना केल्या, लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत दिली जाईल असे आमदार दादाराव केचे यांनी सांगितले. यावेळी तहसीलदार ऐश्वर्या गिरी, प्रभारी कृषी अधिकारी दिगंबर साळे, गटविकास अधिकारी श्री पंधरे, सा. बा.सहाय्यक अभियंता कुबडे, मंडळ अधिकारी प्रदीप ताकसांडे, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक उपस्थित होते. माजी जिप अध्यक्षा सरिता गाखरे, मुकुंद बारंगे, हरिभाऊ धोटे, सुरेश खवशी, राजू डोंगरे, चक्रधर डोंगरे, हनुमंत पठाडे, हरिभाऊ जसुतकर, सुनील इंगळे, नामदेव डोंगरे, माजी जिप सभापती नीता गजाम, ज्योती यावले, दिलीप जसुतकर, श्यामसुंदर चोपडे, दिनेश चौधरी, जीवन चरडे उपस्थित होते.

.png?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)