MLA Dadarao Keche
MLA Dadarao Keche team lokshahi

आमदार केचे शेतकऱ्यांच्या बांधावर, सिंचन विभागाच्या अभियंत्याला खडसावले

नुकसानीतून शेतकरी सुटला तर गाठ माझ्याशी
Published by :
Shubham Tate

वर्धा (भूपेश बारंगे) : - संपूर्ण महाराष्ट्रात संततधार पावसामुळे हाहाकार उडाला आहे. याची झळ वर्धा जिल्ह्यात पोहचली आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्याल्या पावसाने चांगलेच झोडपले आहे. यात आर्वी मतदार संघातील आष्टी, आर्वी कारंजा तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने पावसामुळे शेतपिकांसह, रस्ते, पूल, तलाव, विहिर यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत आर्वी मतदार संघाचे आमदार दादाराव केचे यांनी त्यांच्या मतदारसंघाचा भागात दौरा करण्यात आला. (MLA Dadarao Keche scolded the engineer of the irrigation department on the farmers' dam)

यावेळी तहसीलदार, कृषी अधिकारी, सहाय्यक अभियंता सर्वच विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली आहे. यापूर्वी आर्वी, आष्टी तालुक्याचा दौरा करण्यात आला. यांमध्ये नैसर्गिक हानी मोठ्या प्रमाणात झाली. शेतकऱ्यांच्या शेती अक्षरशः भुईसपाट झाली आहे. अनेकांच्या घराची पडझड झाली आहे. नुकसानग्रस्त भागाची तात्काळ पंचनामे करण्यात यावे यासाठी आज कारंजा तालुक्यात दौरा करण्यात आला.

MLA Dadarao Keche
फक्त 1 रुपयात मुंबई दर्शन, BEST ने सुरू केली सुपर सेव्हर योजना

यावेळी अतिवृष्टी व पूरपरिस्थिती पाहणी करण्याकरिता उमरी येथील तलाव, येणगाव- पिपरी रस्त्यावरील पुल, येणगाव येथील पूल, जसापूर जवळील पूल, चिंचोली, सोनेगाव, सारवाडी, पारडी, हेटीकुंडी, ठाणेगाव येथील शेतपिकांचे पाहणी केली. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आमदार दादाराव केचे यांनी पाहणी केली. अतिवृष्टीमुळे शेतकरी पूर्णतः हवालदिल झाला आहे. यात त्याला भरीव मदत देण्यासाठी शासनाला प्रस्ताव सादर करण्याकरिता तातडीने पंचनामे सादर करायला सांगण्यात आले.

जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची यावेळी आमदार दादाराव केचे यांनी केली. लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत मिळावी यांसाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. नुकसानग्रस्त शेतकरी सुटू नये याची काळजीपूर्वक लक्ष देऊन पंचनामा करण्यात यावा अशी माहिती तहसीलदार ऐश्वर्या गिरी यांना देण्यात आली. शेतपिकांचे पाहणी करताना माजी जिप अध्यक्ष सरिता गाखरे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष शिरीष भांगे, तालुका अध्यक्ष मुकुंदा बारंगे, हरिभाऊ धोटे,सुरेश खवशी, मंगेश खवशी, दिनेश ढोबाळे, जगदीश डोळे,दिलीप जसुतकर, रोशना ढोबाळे, पुष्पा चरडे, रंजना टिपले, राजू टिपले यांच्या सरपंच ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती.

MLA Dadarao Keche
प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला मिळणार सरकारी नोकरी, मोदी सरकारची घोषणा?

खबरदार नुकसानीतून शेतकरी सुटला तर गाठ माझ्याशी

तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतिपावसामुळे कंबरडे मोडले आहे. शेतात असलेलं पीक पूर्णतः खरडून गेले आहे. शेतातील विहीर पावसामुळे खचल्या गेली आहे.यामुळे होत्याच नव्हतं झालं आहे. शेतकऱ्यांन जगावं की मरावं अशी परिस्थिती शेतकऱ्यावर ओढवली आहे.आता असलेलं सरकार हे शेतकरी हिताचे आहे. कोणत्याही शेतकऱ्यांच नुकसानीतून नाव सुटता काम नये याची संबंधित विभागाने घेणे गरजेचे आहे अशी बतावणी चक्क तहसीलदार यांच्या कक्षात आमदार दादाराव कचे यांनी सर्व अधिकारी कर्मचारी यांना दिली आहे.जर शेतकरी सुटला तर गाठ माझ्याशी आहे लक्षात ठेवा माझा शेतकऱ्याला न्याय मिळवा यासाठी प्रयत्न करा.

शेतकऱ्यांच नाव जर आले नाही तर जोड्याने मारील...

पारडी शिवारात एका शेतात चक्क कनिष्ठ अभियंत्याला आमदार केचे नी चांगलेच धारेवर घेतले. तोंडपाहुन कामे करायचे नाही. पैसे दिले त्यां शेतकऱ्यांच नाव बरोबर येते,पण आता हे चालणार नाही माझ्या कानावर जर आले तर मी स्वतः जोड्याने मारल्याशिवाय राहणार नाही अश्या शब्दात अभियंत्याला खडसावले असता उपस्थित शेतकऱ्यांनी टाळ्या वाजवून आमदार केचे यांचे कौतुक केले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com