Ravindra Waikar And Eknath Shinde
Ravindra Waikar And Eknath Shinde

"सत्तेशिवाय पर्याय नसतो, सत्ता आल्यावर तुमची कामे होतात"; शिवसेना पक्षप्रवेशानंतर रवींद्र वायकरांचं मोठं विधान

रवींद्र वायकर यांनी बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Published by :

जोगेश्वरी पूर्वचे आमदार रवींद्र वायकर यांनी अखेर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पक्षप्रेवश केला. यावेळी वायकर यांनी अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. "गेली ५० वर्ष मी शिवसेनेत काम केलं. १९७५ पासून बाळासाहेबांनी जे काही काम दिलं ते मी केलं. आरेतल्या रस्त्यांच्या कामासाठी १७३ कोटी रुपये पाहिजेत. ४५ किमीचे रस्ते बनवण्याची लोकांची मागणी आहे. सत्तेशिवाय पर्याय नसतो, सत्ता आल्यावर कामे होतात, धोरणात्मक निर्णय सत्तेत असल्याशिवाय होऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया रवींद्र वायकर यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यानंतर पत्रकार परिषदेत दिली.

धोरणात्मक निर्णय लोकांसाठी बदलावे लागतात नाहीतर आपण लोकांसाठी काम करु शकत नाही. तुम्ही काम करु शकाल म्हणून लोक आपल्याला निवडून देतात. देशात मोदी चांगल्या पद्धतीने काम करतात. शिंदे राज्यात चांगलं काम करत आहेत. माझ्या परिसरातील प्रश्न सोडवण्यासाठी मी इथे आलो आहे, असंही वायकर म्हणाले.

वायकरांच्या पक्षप्रवेशावर शिंदे म्हणाले, आमदार रवींद्र वायकर यांनी बाळासाहेबांच्या विचाऱ्यांच्या खऱ्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. गेली ४०-५० वर्ष बाळासाहेबांच्या सोबत शिवसेनेत त्यांनी काम केलं आहे. बाळासाहेबांचे विचार पूर्ण राज्यभरात पोहोचवण्याच काम आम्ही करत आहोत. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारणाचं काम आम्ही करत आलो आहोत. मी वायकर परिवाराचं मनापासून स्वागत करतो. त्यांनी आपल्या मतदार संघातील प्रश्न मला सांगितले आहे, देशात नरेंद्र मोदी यांचं विकासाच पर्व आहे. त्यांचं नाव आदराने घेतलं जातं ते त्यांच्या कर्तुत्वाने. आपण दीड वर्षात जे निर्णय घेतले त्याचा परिणाम वायकरांवर झालेला आहे.

ज्या मतदारांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे, त्यांना न्याय देणं आपलं कर्तव्य असतं, रवींद्र वायकरांनी आमच्यावर विश्वास ठेवला आहे. ते गेली अनेक वर्षे काम करतात. चार वेळा आमदार झाले, ते मंत्री होते. संपूर्ण मुंबईची त्यांना माहिती आहे. मतदार संघातील कामे झाली पाहिजेत म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. आज राज्यभरातून लोक शिवसेनेत प्रवेश करत आहेत, त्यांना आमच्यावर विश्वास आहे. मी शब्द दिलेला पूर्ण करतो, मी शब्द फिरवत नाही. शिवसेना -भाजप युती म्हणून आपण निवडणूका लढवल्या होत्या. आणि सर्वसामन्यांना वाटत होतं की युतीचं सरकार यावं पण सुरुवातीला ते झालं नाही. पण दीड वर्षापूर्वी आम्ही ते घडवून आणलं.

आतापर्यंत जे निर्णय झाले नव्हेत ते निर्णय आम्ही घेतले. युती सरकारमध्ये आम्हाला यश मिळालं आहे. हजारो लोक आमच्या कार्यक्रमात येतात आणि सरकारवर विश्वास ठेवतात. राज्यात विकासाचं पर्व सुरु झालं आहे. रवींद्र वायकरांसारखे लोक आमच्यासोबत येतात हीच आमच्या कामाची पोचपावती आहे. रवींद्र वायकर आणि आमच्यातील संभ्रम दूर झाले. आमच्यात तिसराच माणूस संभ्रम निर्माण करत होता. बाळासाहेबांची शिवसेना आधीपासून आहे, शिवसेना भरकवटवण्याचं काम काही लोक करत होते. उबाठा गटाचे ४५ नगरसेवक शिवसेनेत आले आहेत. आणि इतर पक्षातील ५४ नगरसेवक आले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com