Rohit Pawar
Rohit Pawar

"...आता थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या"; रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांना ट्वीटरवर केलं टॅग

पुण्यातील हिट अँड रन प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडत आहेत.
Published by :

Rohit Pawar Tweet On Devendra Fadnavis : पुण्यातील हिट अँड रन प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडत आहेत. अशातच आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. गाडीखाली कुत्रं आलं तरी विरोधक राजीनामा मागतील, असं फडणवीस म्हणाले होते. याच विधानाचा दाखला देत पवारांनी फडणवीसांवर ट्वीटरच्या माध्यमातून पलटवार करत राजीनाम्याची मागणी केली आहे.

रोहित पवार ट्वीटरवर काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही म्हणाला होतात की, ‘‘गाडीखाली कुत्रं आलं तरी विरोधक राजीनामा मागतील.’’गृहमंत्री महोदय…. गाडीखाली कुत्रं नाही तर जीवंत माणसं चिरडली जातायेत… रस्त्याने चालणारा सामान्य माणूस सुरक्षित नाही.. भर दिवसा इंदापूर तहसीलदारावर हल्ला झाल्याने अधिकारीही सुरक्षित नाही.. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक नाही आणि पुण्याच्या पालकमंत्र्यांचा पत्ता नाही! कुठंय तुमचं कायद्याचं राज्य?आपण नेहमी नैतिकतेचे कांदे सोलता… आता थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या!

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com