मोठी बातमी! आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचा मृतदेह सापडला; सकाळीच झालं होतं अपहरण

मोठी बातमी! आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचा मृतदेह सापडला; सकाळीच झालं होतं अपहरण

आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचा मृतदेह सापडला; सकाळी पुण्यातील शेवाळवाडीतून अपहरण झालं होतं.
Published by :
shweta walge
Published on

मोठी बातमी समोर आली आहे. विधान परिषदेचे योगेश टिळेकर यांचे मामा सतिश वाघ यांचा मृतदेह सापडलाय. यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला आहे. आज सकाळीच त्यांचं पुण्यातील शेवाळवाडीतून अपहरण करण्यात आलं होत. एक चारचाकी गाडीतून आलेल्या चौघांनी त्यांचं अपहरण केलं होतं. या घटनेमुळे त्यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा सतीश सातबा वाघ यांचं आज पहाटे पुण्यातून अपहरण करण्यात आलं होतं. सतीश सातबा वाघ (वय ५८, रा. फुरसुंगी, सासवड-पुणे रस्ता, हडपसर) हे सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास घरातून फिरायला बाहेर पडले. त्यावेळी मोटारीतून आलेल्या चार ते पाच जणांनी वाघ यांना धमकाविले. वाघ यांना धमकावून मोटारीत बसवून अपहरणकर्ते सासवड रस्त्याने पसार झाले. त्यावेळी तेथून निघालेल्या एकाने ही घटना पाहिली. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com