महाविकास आघाडीचे आमदार भोपळा घेऊन उतरले विधानभवनाच्या पायर्‍यांवर...
Admin

महाविकास आघाडीचे आमदार भोपळा घेऊन उतरले विधानभवनाच्या पायर्‍यांवर...

बजेट म्हणजे भ्रमाचा भोपळा;घोषणांनी विधानभवनाचा परिसर दणाणला

मिनाक्षी म्हात्रे, मुंबई

बजेटमध्ये मिळाला भोपळा... महाराष्ट्राला मिळाला भोपळा... बजेट म्हणजे भ्रमाचा भोपळा...बजेट म्हणजे रिकामा खोका... सर्वसामान्यांना मिळाला भोपळा... सत्तेत कामी आले खोके, सर्वसामान्यांना मात्र धोके... अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पाचा निषेध केला.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा आठवा दिवस असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली अर्थसंकल्पावर जोरदार निदर्शने केली.

राष्ट्रवादीचे आमदार भोपळा डोक्यावर घेऊनच शिंदे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत विधानभवनाच्या परिसरात दाखल झाले. त्यानंतर पायर्‍यांवर आंदोलन केले.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com