MNS on Zepto : ऑनलाइन पदार्थ मागवताय? झेप्टोच्या आऊटलेटमध्ये एक्सपायरी असलेल्या वस्तू
सध्या ऑनलाइन वस्तू मागवण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र तुम्ही ऑनलाइन ऑर्डर करत असलेल्या वस्तु किंवा खाद्यपदार्थ मुदतबाह्य तर नाहीत ना? अशी खात्री तुम्ही केली आहे का? अशीच एक बातमी झेप्टो संदर्भात समोर आली आहे. ऑनलाइन डिलिव्हरी करणाऱ्या झेप्टोच्या उल्हासनगरमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
उल्हासनगरच्या कॅम्प तीन भागात असलेल्या झेपटो आउटलेटमध्ये आज मनसैनिकांनी धडक दिली, यावेळी मनसैनिकांना त्या ठिकाणी कालबाह्य म्हणजेच एक्सपायरी झालेले खाद्यपदार्थ आढळून आले.
यामध्ये मशरूम, चपाती यासारखे खाद्यपदार्थांचे एक्सपायरी झालेले असताना देखील त्या ठिकाणी विक्रीला ठेवण्यात आले असल्याचा आरोप मनसैनिकांनी केला,यावेळी मनसैनिकांनी झेपटोच्या आउटलेटमध्ये जाऊन तिथल्या व्यवस्थापनाला या संदर्भात जाब विचारला,त्यांनी आपली चुक मान्य केली असून लवकरात लवकर हे एक्सपायरी झालेला सामान या ठिकाणी काढू असं त्यांना आश्वासन दिले आहे. मात्र जर सातत्याने असं होत राहिलं तर मनसे स्टाईलने त्यांना उत्तर दिलं जाईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष वैभव कुलकर्णी यांनी दिला आहे.