MNS In Pune : राज ठाकरेंविरोधातील वादग्रस्त वक्तव्य भोवलं; 'तो फटके खाणारचं...', मनसे कार्यकर्ते आक्रमक

पुण्यातील कोथरूड परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
Published by :
Rashmi Mane

पुण्यातील कोथरूड परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मनसे कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीच्या घराबाहेर येऊन त्याला मारण्याचा पवित्रा घेतला. केदार सोमण असे या कोथरूडमध्ये राहणाऱ्या व्यक्तीचे नाव असून त्यानं मनसे कार्यकर्त्यांसोबत वाद घातल्याचे दिसून आले. त्याने दार लावून घेत कार्यकर्त्यांना शिवीगाळ गेली. मनसे कार्यकर्तेदेखील आक्रमक होत त्याला मारल्याशिवाय जाणार नाही, असे म्हणून लागले. दरम्यान, पोलिसांनी हस्तक्षेप करत मनसे कार्यकर्त्यांना थांब राहण्याचे आवाहन केले. तसेच केदार सोमण यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात घेऊन गेले.

हेही वाचा

MNS In Pune : राज ठाकरेंविरोधातील वादग्रस्त वक्तव्य भोवलं; 'तो फटके खाणारचं...', मनसे कार्यकर्ते आक्रमक
Rapido Bike : रॅपिडो बाईकला खुद्द परिवहन मंत्र्यांनी पकडले; परिवहन विभागाकडून मंत्र्यांना खोटी माहिती
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com