आजपासून मनसेच्या 'घे भरारी' अभियानाला सुरुवात होणार

आजपासून मनसेच्या 'घे भरारी' अभियानाला सुरुवात होणार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यभर घे भरारी अभियानाला सुरुवात होणार आहे. याअंतर्गत मनसेचे नेते प्रत्येक विधानसभा मतदार संघात सभा, बैठका घेणार आहेत. आता या अभियानाच्या पहिल्या सभा आज 6 जानेवारीला मुंबईतील मुलुंड येथे होत आहे.

प्रत्येक विधानसभा मतदार संघात वेगवेगळ्या ठिकाणी सभा, बैठका घ्यायच्या आहेत. मूळ प्रश्नांना बगल देण्याचा प्रयत्न अनेक पक्षांकडून केला जात आहे. लोकांच्या मुलभूत समस्यांबाबत जनजागृती आणि त्यासाठी आवाज उठवण्यासाठी घे भरारी अभियान राबविण्यात येणार आहेत.

अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार येत्या काही दिवसांत घे भरारी अभियान राबविण्यात येणार आहे. घे भरारी मोहिमेच्या माध्यमातून सभा, मेळावे घेऊन मनसे जनतेला पर्याय देणार आहे. त्यामुळे या प्रयत्नात मनसे यशस्वी होते का? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com