Sandeep Deshpande
Sandeep Deshpande Team Lokshahi

Sandeep Deshpande Attack : आज संदीप देशपांडेंची पत्रकार परिषद

मनसे नेते संदीप देशपांडेंवर प्राणघातक हल्ला करण्यात आला.

मनसे नेते संदीप देशपांडेंवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. मॉर्निंग वॉक करत असताना अज्ञाताने हा हल्ला केला. चार अज्ञात इसमांनी त्यांच्यावर हल्ला केला. क्रिकेट खेळताना जे स्टम्प्स वापरतात त्याद्वारे देशपांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला. या चारही इसमांनी आपला चेहरा कपड्याने झाकला होता. हल्ल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या.

याच पार्श्वभूमीवर आज मनसे नेते संदीप देशपांडे पत्रकार परिषद घेणार आहेत. हल्लेखोर हे 25 ते 30 या वयोगटातील होते.हल्लेखोरांकडून शिवीगाळ करण्यात आली. ठाकरेंना नडतोस? वरुणला नडतोस? पत्र लिहितोस, असं हल्लेखोरांनी म्हटले. असे संदीप देशपांडे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार समजते.

शिवाजी पार्क पोलीस स्थानक अशा सर्व जवळच्या पोलीस स्थानकांच्या टीम काल सकाळपासूनच याप्रकरणी तपास करत होत्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com