Sandeep Deshpande BJP entry:
Sandeep Deshpande BJP entry:Sandeep Deshpande BJP entry:

Sandeep Deshpande BJP entry : मनसे नेते संदीप देशपांडे भाजपच्या वाटेवर?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सध्या अस्वस्थतेचे वातावरण आहे. मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे हे राज ठाकरे यांच्या कामकाजावर नाराज असल्याची चर्चा असून, ते भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सध्या अस्वस्थतेचे वातावरण आहे. मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे हे राज ठाकरे यांच्या कामकाजावर नाराज असल्याची चर्चा असून, ते भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. या चर्चांना अधिक बळ मिळाले तेव्हा देशपांडे यांचे जवळचे सहकारी संतोष धुरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ही भेट वर्षा निवासस्थानी झाली असून, भाजप नेते नितेश राणे आणि किरण शेलारही यावेळी उपस्थित होते. त्यामुळे धुरी लवकरच भाजपात प्रवेश करतील, असे संकेत मिळत आहेत.

ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर मनसेतील काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढली. दादरमधील एका वॉर्डचा मुद्दा धुरी यांच्या नाराजीचे मुख्य कारण मानले जाते. अपेक्षित संधी न मिळाल्याने ते अस्वस्थ होते, असे बोलले जाते. अलीकडे संदीप देशपांडेही राज ठाकरे यांच्यापासून थोडे दूर राहात असल्याचे दिसून येत आहे. मनसेसाठी मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळावा, अशी त्यांची भूमिका होती.

संतोष धुरी यांनी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने मनसेत मोठे राजकीय बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. धुरींसोबत संदीप देशपांडेही भाजपात जाणार, अशी जोरदार चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे.

थोडक्यात

• महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) सध्या अस्वस्थतेचे वातावरण
• मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे राज ठाकरे यांच्या कामकाजावर नाराज असल्याची चर्चा
• संदीप देशपांडे भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा
• या चर्चांना बळ मिळाले, देशपांडे यांचे जवळचे सहकारी संतोष धुरी यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट
• वर्षा निवासस्थानी ही महत्त्वाची भेट पार पडली
• भाजप नेते नितेश राणे आणि किरण शेलारही बैठकीला उपस्थित
• संतोष धुरी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, असे संकेत
• मुंबईच्या राजकारणात नव्या हालचालींना वेग

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com