Sandeep Deshpande : "ठाकरे हा ब्रँड नसून..." संदीप देशपांडे यांच ठाकरे बंधूंवर मोठ वक्तव्य
महानगर पालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या ठाकरे ब्रँड मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे. राज ठाकरे असो किंवा उद्धव ठाकरे असो ठाकरेंच्या अनेक घरगुती कार्यक्रमांत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र दिसतात. एवढचं नाही तर त्यांच्यासोबत शिवसेना आणि मनसे पक्ष असे दोघांचे कार्यकर्ते देखील मिळून मिसळून असलेले पाहायला मिळतात. अशातच मनसे नेते आणि प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी ठाकरे ब्रँडवर पडखर प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे ब्रँड हा ब्रँड नसून तो एक विचार असल्याचं त्यांनी म्हटल आहे.
एवढचं नव्हे तर त्यांनी यादरम्यान त्यांच्या ट्वीटर अकाउंटवर पोस्ट देखील केली आहे. याचपार्श्वभूमिवर संदीप देशपांडे म्हणाले की, "ब्रँड हा टूथपेस्टचा असतो. प्रबोधकर हा विचार आहे... बाळासाहेब ठाकरे हा विचार आहे. ब्रँड हा संपतो...ठाकरे हा विचार आहे. पैसे टाकले कि ब्रँड मोठा होतो...पैसे संपले कि ब्रँड संपतो. आज कोलगेट टॉप वर ब्रँड आहे... उद्या पेपसोडेन्ट येईल, मोठमोठे ब्रँड संपले. आम्ही राज साहेबांचे विचार घेऊन पुढे जाऊ, प्रबोधनकार ठाकरेंचे विचार आहेत बाळासाहेबांचे विचार आहेत ते घेऊन आम्ही पुढे जाऊ. आम्हाला आजही खात्री आहे बोकड कापून नाही तर लोकांमध्ये विचार रुजूनच निवडणुका लढवल्या जातील".
तसेच त्यांनी यावर त्याच्या X अकाउंटवर ट्वीट करत म्हणटलं आहे की, "ठाकरे हा ब्रँड नाही विचार आहे.ब्रँड हा बेपारी लोक उभा करतात तर विचार हा संघर्षातून उभ्या झालेल्या चळवळीतून निर्माण होतो.पैसे ओतून ब्रँड तयार करता येतो पण चळवळ नाही.पैसे संपले की ब्रँड संपतो पण विचार नाही.तुमचा बेपारी ब्रँड संपणार पण आमचा मराठी ठाकरे विचार नाही--जय महाराष्ट्र"