Sandeep Deshpande :  संदीप देशपांडे
 भाजपात जाणार का?, केलं मोठं विधान म्हणाले...

Sandeep Deshpande : संदीप देशपांडे भाजपात जाणार का?, केलं मोठं विधान म्हणाले...

Sandeep Deshpande On Joining BJP ahead of BMC Election : राज्यात महापालिका निवडणुकांचे वातावरण तापले असून सर्वच पक्ष जोरदार तयारीत आहेत.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Sandeep Deshpande On Joining BJP ahead of BMC Election : राज्यात महापालिका निवडणुकांचे वातावरण तापले असून सर्वच पक्ष जोरदार तयारीत आहेत. अशाच पार्श्वभूमीवर मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे.

संदीप देशपांडे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, त्यांनी मनसे सोडलेली नाही किंवा भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. सोशल मीडियावर पसरवण्यात आलेल्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या आहेत. आपण आजही मनसेत सक्रिय असून येणाऱ्या निवडणुकांमध्ये पक्ष मजबूत करण्यासाठी काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. माध्यमांशी बोलण्यास बंदी असल्याच्या चर्चाही त्यांनी फेटाळून लावल्या. “असा कोणताही आदेश नाही. पक्षासाठी काम करणे हीच माझी जबाबदारी आहे,” असे ते म्हणाले.

मनसे सोडून भाजपमध्ये गेलेले संतोष धुरी यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना देशपांडे म्हणाले की, प्रत्येकाच्या मताला उत्तर देणे आवश्यक नाही. प्रत्येक व्यक्ती स्वतःचा निर्णय घेत असते आणि त्यावर भाष्य करण्याची गरज नाही, असेही त्यांनी नमूद केले. आपण नाराज आहोत का, या प्रश्नावर संदीप देशपांडे यांनी मिश्किलपणे “दिसतोय का?” असे उत्तर देत सर्व चर्चांना थांबवले. पक्षाचा निर्णय मान्य करून पुढे काम करत राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

थोडक्यात

• राज्यात महापालिका निवडणुकांचे वातावरण चांगलेच तापले आहे.
• सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी आणि रणनीती आखली जात आहे.
• या पार्श्वभूमीवर मनसेच्या अंतर्गत हालचालींकडे लक्ष वाढले आहे.
• मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या...
• सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण..
• निवडणुकीच्या तोंडावर या चर्चांमुळे राजकीय वातावरण अधिकच तापले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com