MNS : पोलिसांची परवानगी नाही, तरी मनसे आज मोर्चा काढणार
Admin

MNS : पोलिसांची परवानगी नाही, तरी मनसे आज मोर्चा काढणार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ स्वप्नपुर्ती रॅली काढण्यात येणार आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ स्वप्नपुर्ती रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. आज अकरा वाजता ही स्वप्नपुर्ती रॅली संस्थान गणपती येथून विभागीय आयुक्त कार्यालयावर जाणार आहे.

पोलिसांनी परवानगी नाकारत नोटीस बजावली आहे. मोर्चा काढण्यावर मनसे मात्र ठाम आहे. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते दाखल होत आहे.सिटीचौक पोलिसांनी काल ही परवनागी नाकारत मनसेला नोटीस बजावली आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था भंग होईल, सार्वजनिक वाहतुकीस कुठलाही अडथळा निर्माण झाला, अनावश्यक गर्दी जमवली तर कायदेशीर कारवाई केली जाईल. असे पोलिसांनी दिलेल्या नोटीसमध्ये आहे.

पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी मोर्चा निघणारच असे मनसेने सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com