स्विमिंगपूलमध्ये आलेली मगर प्राणीसंग्रहालयातलीच, मालकावर गुन्हा दाखल करण्याची मनसेची मागणी
मुंबईच्या शिवाजी पार्कमधल्या महात्मा गांधी स्विमिंग पूलमध्ये एक मगर आढळली. एका कर्मचाऱ्याने मगरीला पाहिल्यानंतर तिला पकडून ड्रममध्ये ठेवलं. त्यानंतर सहा तासांनी मगर वनविभागाच्या ताब्यात देण्यात आली. याआधी देखील अजगर आणि सापासारखे अनेक प्राणी त्याच प्राणीसंग्रहालयातून सुटून बाहेर पडत असतात. त्यामुळे या प्राणीसंग्रहालयावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे, मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी देखील मागणी केली आहे.
यावर आता मगर ही शेजारच्या प्राणी संग्रहालयातीलच स्पष्ट झालं आहे. याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या प्रकरणी प्राणीसंग्रहालयाच्या मालकावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मनसेने केली आहे.
बेकायदेशीररित्या हे प्राणी संग्रहालय चालवलं जातंय आणि तिथे प्राण्यांची तस्करी देखील होते. मगर शेजारीच असलेल्या प्राणीसंग्रहालयातून आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्राणीसंग्रहालयाच्या मालकावर गुन्हा दाखल करावा. असे मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले.