ताज्या बातम्या
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बॅनरबाजी; राज ठाकरेंचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज अमरावती जिल्हा दौऱ्यावर आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज अमरावती जिल्हा दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांच्या अमरावती दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्त्यांकडून शहरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. ही बॅनरबाजी लक्ष वेधून घेत आहे.
राज ठाकरे यांचे अमरावतीत भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावण्यात आले आहेत. दुपारी 2 वाजता अमरावती मध्ये राज ठाकरे दाखल होणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदार संघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे.
यासोबतच राज ठाकरे अमरावती विधानसभा निवडणुकीसाठी पप्पू पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.