Raj Thackeray : "चित्रपट पाहून जागे होणारे हिंदू बिनकामाचे...", राज ठाकरे यांचं कबरीवरुन भाष्य
राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या दिवशी जनतेला संबोधित केले आहे. यावेळी राज ठाकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे. राज ठाकरे यांनी औरंगजेबाच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. विकी कौशलचा 'छावा' चित्रपट पाहिल्यानंतर हिंदू जागे झाले. पण असा हिंदू बिनकामाचा अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे. त्याचप्रमाणे चित्रपट पाहिल्यानंतरच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब कळले का? असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला आहे.
यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "औरंगजेब प्रकरण काय होतं ? हे माहीत आहे का? दाहोत गावात औरंगजेबाचा जन्म झाला. जातीवर बोलणाऱ्यांचा इतिहासाशी काहीही संबंध नाही. औरंगजेबाळा ब्राह्मणांनी आणि मराठ्यांनीही साथ दिली. पण आता जे या सगळ्यावर बोलत आहेत त्यांना फक्त राजकीय पोळी भाजायची आहे. ते तुमची माथी भडकावण्याचे काम करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज एक संस्कार आहे. इतिहासातील प्रत्येक गोष्ट कागदावर लिहलेली नाही. त्यावेळच्या परिस्थितीनुसार घेतलेले निर्णय आहे. इतिहासाला जातीच्या चष्म्यातून पाहू नका. 1981 साली औरंगजेब महाराज महाराष्ट्रात आला. औरंगजेब 27 वर्ष महाराष्ट्रत लढत होता. औरंजेबाला शिवाजी महाराजांचे विचार मारायचे होते".
औरंगजेबाच्या कबरीवर बोर्ड लावा. ता कबर आहे ना? मग त्यावर असलेली सजावट काढून टाका. इथेच अफझल खानाला गाडला आहे असा तिथे एक बोर्ड लावा. त्या ठिकाणी लहान मुलांच्या सहली घेऊन जाऊन त्यांना इतिहास सांगा. कोणाला गाडला हे सांगा. इतिहास जातीतून जो सांगण्याचा प्रयत्न करेल तो माथी भडकवण्याचा प्रयत्न करत आहे हे लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे सर्व तरुण व तरुणींना आवाहन आहे की व्हॉट्सअॅप वर इतिहास वाचणे बंद करा. तुमची माथी भडकावून इथे वेगळी कामे केली जातात".