शरद पवार यांच्या निवृत्तीच्या निर्णयावर मनसेच्या राजू पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले, यासाठी त्यांनी मास्टर स्ट्रोक खेळला असेल...
Admin

शरद पवार यांच्या निवृत्तीच्या निर्णयावर मनसेच्या राजू पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले, यासाठी त्यांनी मास्टर स्ट्रोक खेळला असेल...

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवृत्त होण्याची घोषणा केली.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवृत्त होण्याची घोषणा केली. यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली असून यावर आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, हा निर्णय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मान्य नाही. यामुळे अनेक कार्यकर्ते भावूक झाले असून शरद पवारांना घोषणा मागे घेण्याचे मागणी करत आहेत. तर, शरद पवारांनी निर्णय मागे घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी उपोषण आंदोलन सुरु केले.

यावरुन आता अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसेचे आमदार राजू पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, शरद पवार आहेत आणि त्यांच्यावर भाष्य करण्याएवढा मी मोठा नाही. परंतू, एकंदरीत ज्या हालचाली चालल्या होत्या, जे ऐकायला येत होतं, त्या अफवा असतील कदाचित, त्या कुठेतरी थांबाव्यात यासाठी त्यांनी मास्टर स्ट्रोक खेळला असेल असे राजू पाटील म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com