उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर मनसेची प्रतिक्रीया म्हणाले...

उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर मनसेची प्रतिक्रीया म्हणाले...

दरवर्षी शिवाजी पार्कवर होणारा दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले.
Published by :
Siddhi Naringrekar

दरवर्षी शिवाजी पार्कवर होणारा दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. या दसरा मेळाव्यात एकमेकांवर जोरदार आरोप - प्रत्यारोप ही केले गेले. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिवसेनेचा वार्षिक दसरा मेळावा हा शिवाजी पार्क मैदानात पार पडला तर शिंदे गटाचा दसरा मेळावा हा वांद्रे- कुर्ला संकुलात झाला.

याच पार्श्वभूमीवर उद्धव यांच्या या भाषणावर राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून प्रतिक्रिया आली आहे. संदिप देशपांडे म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या भाषणातील अनेक मुद्दे हे नळावरील भांडणाप्रमाणे होते. संदिप देशपांडे यांनी लगेच ट्विटरवरुन “नुसतीच ‘उणी’ ‘धुणी’ ‘नळ’ आणि ‘भांडण’; विचार ही नाही आणि सोनं ही नाही,” असे म्हटले आहे.

उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर मनसेची प्रतिक्रीया म्हणाले...
आम्ही केलेली गद्दारी नाही तर गदर, मुख्यमंत्री शिंदे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com