संदीप देशपांडे हल्ला प्रकरण: हल्ल्याच्या निषेधार्थ शिवाजी पार्क येथे मूक रॅलीचं आयोजन
Admin

संदीप देशपांडे हल्ला प्रकरण: हल्ल्याच्या निषेधार्थ शिवाजी पार्क येथे मूक रॅलीचं आयोजन

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर मॉर्निंग वॉक गेले असता अज्ञात इसमांनी हल्ला केला होता.

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर मॉर्निंग वॉक गेले असता अज्ञात इसमांनी हल्ला केला होता. याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याच पार्श्वभूमीवर आज हल्ल्याच्या निषेधार्थ शिवाजी पार्क येथे मूक रॅलीचं आयोजन करण्यात आले आहे.

हाताला काळी फित बांधून हल्ल्याचा निषेध करण्यात येत आहे. पोलीस आता तपास करत असून चौकशी करत आहेत. मला पोलिसांवर विश्वास आहे. केवळ क्रिकेटर नाही तर कोच पण बाहेर येतील. जेव्हा आरोपी पकडला जाईल तेव्हा मी अधिक बोलेन. ही वीरप्पन गँग कोण आहे हे सगळ्यांना माहित आहे. असे म्हणत संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेतली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com