रस्त्यावर ‘पवार…पवार’ असं ओरडत दगड भिरकवत फिरायची पाळी येईल; संदीप देशपांडेंचं संजय राऊतांना पत्र

रस्त्यावर ‘पवार…पवार’ असं ओरडत दगड भिरकवत फिरायची पाळी येईल; संदीप देशपांडेंचं संजय राऊतांना पत्र

संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंद यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर सुपारी देण्याचे गंभीर आरोप केले.
Published by :
Siddhi Naringrekar

संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंद यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर सुपारी देण्याचे गंभीर आरोप केले. यासंबंधी त्यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्र लिहले आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन महत्वाची माहिती दिली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. यावरुन राजकीय वर्तुळातीतून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांनी पत्र लिहिले आहे. संदिप देशपांडे यांनी पत्रात संजय राऊत यांनी सल्ला दिला आहे. देशपांडे म्हणाले की, “आपण रोज पत्रकार परिषद घेता, ती रोज न घेता दोन दिवसातून एकदा घ्या, मग आठवड्यातून एकदा घ्या, जर शक्य नसेल तर पत्रकार परिषेदच्या १० ते १५ मिनिटे पूर्वी योगा करा. त्यामुळे तुम्हाला थोडं बरं वाटेल. असे देशपांडे म्हणाले आहेत.

तुम्ही काही एकटेच या ऱ्हासाला जबाबदार नाहीत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेही तेवढेच जबाबदार आहेत, हे लक्षात घ्या, नाहीतर काही दिवसांनी रस्त्यावर ‘पवार…पवार’ असं ओरडत दगड भिरकवत फिरायची पाळी आपल्यावर येईल. आपणच सगळ्यांना पवार साहेबांच्या नादी लावलं आहे. म्हणून शिवसेना हातून गेली. काळजीपोटी हा पत्रप्रपंच केला. पटलं तर घ्या. असे संदिप देशपांडे म्हणाले.

तसेच त्यांनी पुढे लिहिले आहे की, “तुमच्याबद्दल वाटणाऱ्या काळजी पोटी हे पत्र लिहीत आहे.आपली चीडचीड होताना दिसत आहे. आपल्या मनाविरुद्ध घटना घडू लागल्या की माणसाचा संयम ढाळू लागतो. तुम्ही कितीही नाकारलं तरी ही सगळी लक्षणे तुमच्यात दिसायला लागली आहेत. हे सगळं हाताबाहेर जाण्याआधीच काळजी घ्यायला हवी. त्याची चीडचीड व्हायला लागते. कधी कधी तर नैराश्याचे झटकेही येऊ लागतात. आपण बिनबुडाचे आरोप करीत आहात. असे देशपांडे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com