संभाजीनगरमध्ये मनसे-शिवसेना UBT कार्यकर्ते आमने-सामने

संभाजीनगरमध्ये मनसे-शिवसेना UBT कार्यकर्ते आमने-सामने

छत्रपती संभाजी नगर मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले
Published by :
shweta walge

छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आली. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी २०० रुपयाची नोट मनसे कार्यकर्त्यावर ओवाळली. जवळपास 15 ते 20 मिनिटापासून हा जो आमने सामने आल्याचा राडा सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. प्रचारादरम्यान उठ दुपारी घे सुपारी, मनसे आणि दोनशे अशा घोषणा उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून दिल्या. मनसे- ठाकरे गट समोरासमोर येऊन एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू झाली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com