Accident Death|Akola Accident Team Lokshahi
बातम्या
राज ठाकरे यांच्या सभेसाठी रत्नागिरीला जात असताना अपघातात मनसेच्या उपशाखाप्रमुखाचा मृत्यू
राज ठाकरे यांची आज रत्नागिरीत सभा आहे.
राज ठाकरे यांची आज रत्नागिरीत सभा आहे. रत्नागिरी शहरातील प्रमोद महाजन क्रिडा संकुल मैदानावर राज ठाकरेंच्या सभेसाठीची मनसैनिक जय्यत तयारी करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर एक दुखद घटना घडली आहे.
राज ठाकरे यांच्या सभेसाठी निघालेल्या मनसैनिकांच्या गाडीला रत्नागिरीजवळ अपघात झाला आहे. या अपघातात मनसेचे दहिसर विभागाचे उप शाखाप्रमुख देवा साळवी यांचे निधन झाले आहे. जे मनसैनिक या अपघातात जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.