कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेची माघार; अभिजीत पानसे यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेची माघार; अभिजीत पानसे यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

कोकण पदवीधर निवडणुकीतून मनसेने माघार घेतली असल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

कोकण पदवीधर निवडणुकीतून मनसेने माघार घेतली असल्याची माहिती मिळत आहे. अभिजीत पानसे निवडणुकीचा अर्ज भरणार नाही आहेत. कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेकडून अभिजीत पानसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र आता अभिजीत पानसे निवडणुकीचा अर्ज भरणार नसल्याची माहिती मिळत आहे. अभिजित पानसे यांचे नाव मागे घेण्यात आले आहे.

याच पार्श्वभूमीवर आता अभिजीत पानसे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. अभिजीत पानसे म्हणाले की, आमचा पक्ष हा आदेशावर चालतो. मला आनंद आहे पक्षाने मला आदेश दिला तो आधीही पाळला होता आणि आजही अत्यंत आनंदाने पाळला. राज साहेबांनी उडी मारायला सांगितली की उडी मारणार.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, त्यामुळे आज मी फॉर्म भरायला जाणार होतो पदवीधर म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आज फॉर्म भरायचा नाही. माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी केलेल्या विनंतीला सन्माननीय साहेबांनी मान दिलेला आहे. आम्ही त्यामुळे फॉर्म भरायला गेलो नाही. असे अभिजीत पानसे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com