Mahesh Tapase
Mahesh TapaseTeam Lokshahi

'मोहन भागवत यांनी केंद्र सरकारला खडे बोल सुनवन्याची आवश्यकता' राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जाती व वर्णव्यवस्था नष्ट केली पाहिजे असं विधान केलं होतं.

मयुरेश जाधव, अंबरनाथ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जाती व वर्णव्यवस्था नष्ट केली पाहिजे असं विधान केलं होतं. याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी जाती वर्ण व्यवस्था आणि दलितांना समान हक्क समान संधी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत दलितांवरचा अत्याचार बंद होणार नाही. कृतीमध्ये आणण्यासाठी मोहन भागवतांनी सरकारला देखील खडे बोल सोनवण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

यावेळी बोलताना तपासे यांनी देशातील जाती व वर्णव्यवस्था नष्ट करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केले. म्हणूनच काळाराम मंदिरात प्रवेश मिळाला, गणपतराव तपासे यांनी मंदिर प्रवेश कायदा आणून दलितांसाठी मंदिर उघडे केले, मात्र हजारो वर्षांपासून रोजगारापासून सामाजिक न्याय हक्कापासून वंचित ठेवण्यात आलं. या संदर्भात मोदी सरकारच्या कालखंडात अत्याचार वाढला आहे.

हा नॅशनल क्राइम रेकॉर्ड सांगत आहे. 11% ची ॲट्रॉसिटीची वाढ ही 2019 ते 2021 या कालखंडात झाली आहे. सात लाख केसेस या कालखंडात दर्ज झालेले आहेत अशा पद्धतीने दलितांवर अत्याचार होत आहेत त्याच्या संदर्भात आरएसएसने मोदी सरकारला सूचना देण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

Mahesh Tapase
वडील शिंदे गटासोबत, तर मुलाचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा; ठाकरे पिता-पुत्रामध्ये मतभेद
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com