Mohan Bhagwat On Population | प्रत्येक दाम्पत्याला किमान तीन मुलं हवीत; मोहन भागवत यांचं मोठं विधान

Mohan Bhagwat On Population | प्रत्येक दाम्पत्याला किमान तीन मुलं हवीत; मोहन भागवत यांचं मोठं विधान

मोहन भागवत यांचे विधान: प्रत्येक दाम्पत्याला किमान तीन मुलं हवीत, घटती लोकसंख्या समाजासाठी चिंताजनक.
Published by :
shweta walge
Published on

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपुरात झालेल्या कातळे कुल परिषदेत भारताच्या लोकसंख्येबाबत एक धक्कादायक भाष्य केले आहे. 'कोणत्याही समाजाचा लोकसंख्या वाढीचा दर 2.1% च्या खाली गेला तर तो समाज नष्ट होईल आणि तो समाज आपोआपच नष्ट होईल अस विधान केलं आहे.

मोहन भागवत म्हणाले की, घटती लोकसंख्या ही समाजासाठी चिंताजनक आहे. लोकसंख्या वाढीचा दर 2.1 पेक्षा कमी झाला तर समाज नष्ट होणं निश्चित आहे आणि ते नष्ट करण्यासाठी कोणत्याही बाह्य शक्तीची गरज नाही, असेही भागवत म्हणाले. विज्ञान मानते की लोकसंख्या वाढीचा दर 2.1 च्या खाली गेला तर तो समाज आपोआपच संपुष्टात येतो. उदाहरणे देताना ते म्हणाले की, या कारणामुळे अनेक भाषा आणि समाज संपुष्टात आले.

'आपल्या देशानं १९९८ किंवा २००२ मध्ये लोकसंख्या धोरण तयार केलं. लोकसंख्येचा वृद्धी दर २.१ च्या खाली जाता कामा नये असं त्यात नमूद करण्यात आलं आहे. जर आपण लोकसंख्या वाढीचा दर २.१ विचारात घेतला, तर आपल्याला दोनपेक्षा अधिक मुलांची गरज आहे. तीन तर असायलाच हवेत. लोकसंख्येचं विज्ञान हेच सांगतं. समाज टिकायला हवा यासाठी संख्या महत्त्वाची आहे.

मोहन भागवतांचे हे विधान समाजात लोकसंख्या धोरणाबाबत जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न आहे. जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांसाठी आवश्यक संसाधनांची उपलब्धता सुनिश्चित करता येईल. मात्र त्यांनी केलेले हे विधान चर्चेत आले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com